Ladaki Bahin eKYC: eKYC पूर्ण करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी; निवडणुका होईपर्यंत मुदत वाढणार का?

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा न चुकता सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांना त्यांचे ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही सोपी प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून २ ते ५ मिनिटांत पूर्ण करू शकता.

e-KYC साठी आवश्यक गोष्टी

ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन आधार क्रमांक लागतील:

  1. लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक.
  2. विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक किंवा अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक.

e-KYC प्रक्रिया (स्टेप-बाय-स्टेप)

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील पायऱ्या वापरा:

पायरी १: वेबसाइटवर जाणे

  • Google मध्ये “लाडकी बहिण महाराष्ट्र gov in” असे लिहून अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तिथे “लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा” या पर्यायावर क्लिक करा.

पायरी २: लाभार्थी महिलेची माहिती

  • लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाका.
  • कॅप्चा भरा आणि “मी सहमत आहे” वर टिक करा.
  • “OTP पाठवा” बटण दाबा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ६ अंकी OTP टाकून सबमिट करा.

पायरी ३: कुटुंबातील सदस्याची माहिती

  • दुसरा आधार क्रमांक टाकण्याच्या पायरीवर, महिला विवाहित असल्यास पतीचा आधार क्रमांक टाका.
  • महिला अविवाहित असल्यास वडिलांचा आधार क्रमांक टाका.
  • पुन्हा कॅप्चा भरा, “मी सहमत आहे” वर टिक करा आणि “OTP पाठवा” बटण दाबा.
  • त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा.

पायरी ४: जात प्रवर्ग आणि घोषणा

  • जात प्रवर्ग: दिलेल्या यादीतून तुमचा योग्य जात प्रवर्ग निवडा.
  • महत्त्वाची घोषणा: येथे दोन महत्त्वाचे पर्याय येतील, दोन्ही ठिकाणी “होय” निवडणे अत्यंत आवश्यक आहे:
    1. पर्याय १: कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत कायम कर्मचारी नाही.
    2. पर्याय २: कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेते.
  • टर्म्स आणि कंडिशन वाचून त्यावर टिक मार्क करा.

पायरी ५: अंतिम सबमिशन

  • शेवटी “सबमिट” बटण दाबा.
  • तुमच्या स्क्रीनवर “e-KYC यशस्वी” असा मेसेज दिसेल.

महत्त्वाची सूचना: ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास तुमचा मासिक हप्ता थांबू शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर ई-केवायसी पूर्ण करा.

राज्यातील फक्त 1 कोटीहून अधिक महिलांची eKYC अजूनही बाकी आहे; वेबसाईट वर एक दिवसाला फक्त काही लाखो महिलांची KYC पूर्ण होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारकडे मुदतवाढ करण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असे दिसून येते.

WhatsApp Icon व्हाटसऍप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment